कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य विफा आंतर जिल्हा पुरुष (खुला गट) टीयर-१ फायनल राऊंड स्पर्धा कोल्हापूर येथे रंगणार आहे. ही स्पर्धा ५ ते ९ मे २०२६ या कालावधीत पोलो ग्राउंड व छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्न व मार्गदर्शनातून करण्यात आले आहे. फायनल राऊंडमध्ये एकूण आठ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धा लीग कम नॉकआउट पद्धतीने खेळवली जाणार असून एकूण १६ सामने होणार आहेत. यात गतवर्षीचे उपांत्य फेरीतील कोल्हापूर, पुणे, मुंबई व नागपूर या संघांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या गट फेरीतून पात्र ठरलेले ठाणे, वर्धा, गडचिरोली व पालघर हे संघही आपले कौशल्य दाखवणार आहेत.
दररोज चार सामने खेळवले जाणार असून सकाळी ७:३० ते १२ आणि दुपारी २:३० ते ६:३० या वेळेत सामने होतील. राज्यभरातील उत्कृष्ट खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेमुळे कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तरी कोल्हापूरातील क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आजपासून कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य विफा आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचा थरार
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
26 %
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

