Homeराजकियपश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दूचेरी येथील विजयाबद्दल भाजपातर्फे   आनंदोत्सव

पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दूचेरी येथील विजयाबद्दल भाजपातर्फे   आनंदोत्सव

कोल्हापूर :
पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दूचेरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो… नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
यावेळी खा. धनंजय महाडिक म्हणाले की, हा विजय केवळ पक्ष म्हणून नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख धोरणांचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या दडपशाही आणि एकाधिकारशाहीला सुरुंग लावला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या दहशतमुक्तीसाठी खंबीर पावले उचलली. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होऊन भाजपला संपूर्ण जनाधार मिळाला.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात विजयाचे श्रेय भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दिले. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विजयाने हे सिद्ध केले आहे की, जनतेला आता केवळ विकास आणि सुशासन हवे आहे. भाजप या दोन्ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपचा विस्तार होत असून, ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत आहे.
याप्रसंगी भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी बुवा, अमर साठे, हेमंत आराध्ये, भरत काळे, संतोष लाड, विजय अग्रवाल, गणेश देसाई, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, दीपक काटकर, संतोष भिवटे, सयाजी आळवेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, नगरसेवक रेखा उगवे, माधुरी व्हटकर, माधुरी नकाते, अर्चना कोराणे, विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, विश्वजित पवार, महेश यादव, धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, सुनील पाटील, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, संभाजी शिंदे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
26 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page