कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूरतर्फे अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर येथे आयोजित जी एच रायसोनी स्मृती १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. मुलींच्या गटात अंतिम पाच फेऱ्यांनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटील हिने ५ पैकी ४.५ गुण मिळवत अजिंक्यपद पटकावले. जयसिंगपूरच्याच सिद्धी कर्वे हिने ३.५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. नांदणीच्या संस्कृती सुतार हिने तृतीय स्थान पटकावले, तर हर्षदा सूर्यवंशी पाटील हिने चौथे स्थान मिळविले.
मुलांच्या गटात अंतिम सहा फेऱ्यांनंतर इचलकरंजीच्या अथर्व तावरे याने ६ पैकी ५.५ गुण मिळवत अजिंक्यपद मिळविले. जयसिंगपूरच्या हित बलदवा याने ५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. कोल्हापूरच्या सर्वेश पोतदार व प्रणव मोरे यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळविले.
इतर गटांतील विजेते….
• १५ वर्षाखालील: राधेश्वर ठोंबरे, सृष्टी जोशीराव
• १३ वर्षाखालील: अर्णव पोर्लेकर, आरोही बनसोडे
• ११ वर्षाखालील: वन्शील ठक्कर, नारायणी घोरपडे
• ९ वर्षाखालील: अद्वैत कुलकर्णी
• ७ वर्षाखालील: शिवराज कामटे
स्पर्धेचा बक्षीस समारंभ दिलीप पोतदार, अर्चना मोरे, सुप्रिया पोर्लेकर व विद्या घोरपडे यांच्या हस्ते पार पडला. सर्व विजेत्यांना एकूण ₹६००० रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, या स्पर्धेतून पुणे येथे १५ ते १७ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी कोल्हापूर संघाची निवड करण्यात आली. त्या संघात मुले: अथर्व तावरे, हित बलदवा, सर्वेश पोतदार, प्रणव मोरे तसेच मुली: दिशा पाटील, सिद्धी कर्वे, संस्कृती सुतार, हर्षदा सूर्यवंशी पाटील यांचा समावेश आहे.
——————————
१९ वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील व अथर्व तावरे अजिंक्य
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

