कोल्हापूर :
भुवनेश्वर (ओडिशा) येथील KIIT University येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी महिला व पुरुष रग्बी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
श्वेता साताप्पा चिक्कोडी (एम.कॉम भाग २), रितिका प्रविण मगदूम (एम.ए. भाग २), सिध्देश पांडुरंग देवाने (बीसीए भाग २) आणि हर्षवर्धन धनंजय पाटील (एमएससी भाग १) यांनी शिवाजी विद्यापीठाच्या रग्बी संघाचे प्रतिनिधित्व करत सिल्व्हर मेडल पटकावले. विशेष म्हणजे, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्तरावर महिला व पुरुष रग्बी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवण्याचा मिळवला आहे.
या यशाबद्दल खेळाडूंना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे तसेच सीईओ कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच खेळाडूंच्या आई-वडिलांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या खेळाडूंचे रग्बी स्पर्धेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
30.5
°
C
30.5
°
30.5
°
64 %
5.2kmh
5 %
Thu
31
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
30
°
Mon
30
°

