कोल्हापूर :
कणेरी (ता.करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान संचलित सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी. नर्सिंगच्या परीक्षेत महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
या परीक्षेत महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे नर्सिंग शिक्षण मिळावे, या उद्देशाने परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय कार्यरत आहे.
यावेळी विशेष प्रावीण्यसह अनेक विद्यार्थ्यांनी विषयांनुसार विशेष गुण मिळवले आहेत. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या सुसज्ज सोयी-सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे व प्रॅक्टिकल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मिळालेला दांडगा अनुभव या यशाचा मुख्य पाया ठरला आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना महाविद्यालयाचे व्यवस्थापक विवेक सिद्ध यांनी सांगितले की, परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सिद्धगिरी मठाकडून मिळणारे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यात हे विद्यार्थी आरोग्य सेवेमध्ये आपले मोठे योगदान देतील, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या घवघवीत यशाबद्दल प्राचार्या रेगिना सातवेकर, उपप्राचार्य सुरज चोपडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य लीना काळे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय बी.एस्सी. नर्सिंगचा निकाल १०० टक्के
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

