कोल्हापूर :
दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या ड्रीम वर्क फन फेअरमध्ये मनोरंजनासह धमाल मस्ती लहान मुलांना करायला मिळणार आहे. यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत. ज्यामध्ये अवतार चित्रपटात साकारण्यात आलेल्या सर्व बाबी उभ्या करण्यात आल्या आहेत. अवतारचा आवाज त्यांचा पक्षी, त्याचे जंगल सर्व येथील आयर्विन ख्रिश्चन मैदानावर ही पर्वणी पाहण्यास मिळणार असल्याची माहिती संयोजक निजामुद्दीन आणि प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ड्रीम वर्क फन फेअरमध्ये लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत. या ठिकाणी अवतार ही नगरी अवतार चित्रपटावर आधारित उभी करण्यात आली आहे. यांसह अवतार शो, दुबई वॉटरफॉल, शॉपिंग स्ट्रीट, चाट भंडार, फूड फेस्ट, मजेदार गेम्स आणि १० पेक्षा जास्त भव्य राईड्स यात जायंट व्हील, ब्रेक डान्स, कोलंबस, सोलोम्बो, ड्रॅगन राईड, किड्स राईड्स, मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत.
मुलांसाठी जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन केंडी, पाणीपुरी, चाट आदी खाण्यास मिळणार आहे. शिवाय सेल्फीही काढता येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तरी काल्हापूर मध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
——————————
कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार प्रथमच ड्रीम वर्क फन फेअरमध्ये अवतारची नगरी
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
82 %
5.4kmh
98 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

