Homeसामाजिकजागतिक हिवताप दिन  साजरा

जागतिक हिवताप दिन  साजरा

कोल्हापूर :
सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा हिवताप कार्यालय येथे डॉ. सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला राजाध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी जे. के. कांबळे यांनी हिवताप दिनाचे महत्त्व सांगून सर रोनाल्ड रॉस यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, धनश्री कोरवी, सामाजिक कार्यकर्ते महेश कोरवी, डॉ. पवार, डॉ. अमोल माने, डॉ. संदेश कांबळे, जे. के. कांबळे, डॉ. योगिनी कुलकर्णी उपस्थित होते.
तत्पूर्वी आशा स्वयंसेविका यांनी डासांपासून होणारे आजार याविषयी  पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक एस. पी. यादव, झोनल एंटमोलॉजीस सतीश सावंत, आरोग्य निरीक्षक अशोक थैल, किटक समाहरक सतीश ढेकळे, प्रणव जाधव, संजय पाटील, शंकर कुंभार, आरोग्य सेवक जावेद मुल्ला, ऋषिकेश परुळेकर, राहुल डोंगळे, संबंधित विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका शासकीय  मेडिकल कॉलेजचे (पीएसएम) विद्यार्थी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमोल माने  तर आभार डॉ. योगीनी कुलकर्णी यांनी मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.8 ° C
30.8 °
30.8 °
63 %
6.1kmh
11 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
31 °
Sun
30 °

Most Popular

You cannot copy content of this page