Homeकला - क्रीडाडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला कब्बडी स्पर्धेत विजेतेपद

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला कब्बडी स्पर्धेत विजेतेपद

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या लीड कॉलेज विभागीय कब्बडी स्पर्धेत तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस संघाने मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. तात्यासाहेब कोरे कॉलेज उपविजेतेपद ठरले.
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वारणानगर येथे या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे व तात्यासाहेब कोरे कॉलेज या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला. या सामन्यात २५ विरुद्ध १७ अशा गुण फरकाने टेक्निकल कॅम्पसच्या मुलांनी विजेतेपद मिळवले. या संघाला जिमखाना प्रमुख व्ही. बी. उतळे यांचे मार्गदर्शन लाभले.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर यांनी विजेत्या संघातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळातही सहभागी होणे गरजेचे असून यातून संघ भावना, नेतृत्व, तंदुरुस्ती असे विविध गुण विकसित होतात. आमच्या संघाने मिळवलेला हा विजय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुण विकसीत करण्यासाठी आमची संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विजेत्या संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page