कोल्हापूर :
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष “Narcotics Awareness Program” चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज व अँटी नार्कोटिक टास्क फोर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा अंब्राळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज च्या अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी,श्रुती मंत्री,जयेश गांधी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रोटेरियन पूजा गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर अँटी नार्कोटिक टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात आला. इयत्ता ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या वयानुसार योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व समुपदेशन कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पस्ते, पोलीस कॉन्स्टेबल महेश गवळी आणि अर्जुन बांद्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अमली पदार्थांच्या वापराचे धोके, कायदेशीर बाबी आणि सुरक्षित जीवनशैली याबाबत माहिती दिली. एकूण सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांकडून अनेक शंका व प्रश्न विचारण्यात आले, ज्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी शांतपणे व सविस्तर उत्तरे दिली.
या कार्यक्रमामुळे इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ——————————
पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2
°
C
28.2
°
28.2
°
83 %
9.2kmh
99 %
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
28
°

