• डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या ‘बायोस्किल-२०२६’ परिषद संपन्न
कोल्हापूर :
आजच्या काळात जैवतंत्रज्ञानाचे महत्व अतिशय वाढले असून औषधनिर्मिती, कृषी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावीपणे वापरले जात आहे. भविष्यातील करिअरसाठी या क्षेत्रात कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम संशोधक डॉ. एस. आर. यादव यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायोस्किल-२०२६’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
परिषदेचे उदघाटन कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. एस. आर. यादव, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर यांच्या हस्ते झाले. यावेळी संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, प्रा. डॉ. के. डी. सोनवणे, प्रा. डॉ. अर्पिता पांडे- तिवारी, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. शिवाजी काष्टे, डॉ. पद्मजा देसाई, डॉ. रजनी बनसोडे, डॉ. मेघा देसाई, डॉ. अश्विनी काळे आदी उपस्थित होते.
यावेळी यादव पुढे म्हणाले की, स्टेम सेल आणि पुनरुत्पादक औषधशास्त्रामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडत असून भविष्यात अनेक असाध्य रोगांवर प्रभावी उपचार शक्य होणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील कौशल्ये, डेटा विश्लेषण, बायोइन्फॉर्मेटिक्स आणि आंतरशाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.
डॉ. सय्यद जी. दस्तगर म्हणाले की, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढविण्याची गरज असून, बॅक्टेरियल नॅनोसेल्युलोज हे भविष्यातील अत्यंत उपयुक्त जैवसाहित्य ठरणार आहे. बॅक्टेरियल नॅनोसेल्युलोजची नॅनो-फायब्रिलर रचना आणि उच्च जलधारण क्षमता यामुळे ते पेशींचे स्थिरीकरण आणि वाढ (यासाठी अनुकूल ठरते. त्यामुळे वैद्यकीय, औषधनिर्मिती, ऊतक अभियांत्रिकी, तसेच अन्न व पॅकेजिंग उद्योगात त्याचा व्यापक वापर होऊ शकतो.
कुलगुरू डॉ. शर्मा यांनी जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल व पुनरुत्पादक औषधशास्त्र या क्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन केले. त्यांनी या क्षेत्रातील संशोधन, आरोग्यविषयक उपयोग आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा आढावा घेतला. परिषदेत एकूण १० महाविद्यालयांमधून १३० प्रतिनिधी उपस्थित होते
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक : डॉ. एस. आर. यादव
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

