Homeशैक्षणिक - उद्योग अमृत संस्थेच्यावतीने रविवारी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

अमृत संस्थेच्यावतीने रविवारी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

कोल्हापूर :
लक्षित गटातील उद्योजकांसाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादन अथवा विक्री करत असलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यासाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन रविवारी (दि. १५) सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी स्टॉल बुकिंगसाठी इच्छुक उद्योजकांनी दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन अमृतचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, नायर, ऐयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, कम्मा, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, येलमार, कानबी, नेपाळी हिंदू, भूमिहार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे.
हा कार्यक्रम ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम कोल्हापूर व महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये लक्षित गटातील उद्योजकांनी तयार केलेल्या किंवा विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या उत्पादनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. यामुळे त्यांच्या मालाच्या विक्रीत वाढ होऊन व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे.
अमृतच्या लक्षित गटातील व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला नवी ओळख आणि प्रसिद्धी मिळवून द्यावी, असेही व्यवस्थापक श्री. जोशी यांनी सांगितले.
————————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
76 %
8kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page