कोल्हापूर :
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि. ४) सकाळी १०:४५ वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे माजी प्राचार्य रविंद्र येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर यांची प्रमुख उपस्थिती आहे. समारंभाचे कार्याध्यक्ष रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे हे आहेत. तसेच क्रीडा संचालक व एनसीसी अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांचीही उपस्थिती आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी आजी-माजी विद्यार्थी, पालक व परिसरातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कार्याध्यक्ष प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे व मेजर डॉ. समीर पवार यांनी केले आहे.
——————————————————-