• शानदार कार्यक्रमामध्ये लोकार्पण सोहळा संपन्न
कोल्हापूर :
कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केले. मंत्री महोदयांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर सौ. रुपाराणी निकम, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, पुरातत्व पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, सहसंचालक डॉ. विलास वाहणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. रमेश जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. राज्य सरकारने या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. कोल्हापूर शहर हे राष्ट्रीय इतिहास पर्यटनाचे केंद्र बनावे अशी अपेक्षा व्यक्त करीत या स्मारकाच्या रिकाम्या जागेत तिसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.
विदेशात असलेली जगदंबा तलवार लीजवर भारतात आणावी अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली. यावर उत्तर देताना ती तलवार आणण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही श्री. शेलार यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस जतन व नियमायक समिती अंतर्गत असणाऱ्या वस्तूसंग्रहालय उपसमितीतील सदस्यांचा श्री. शेलार यांच्या हस्ते ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू सलोखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‘शाहू समता ज्योत’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महेश जाधव, डॉ. मंजुश्री पवार, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, शाहू स्मारकचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे, पॅलेसचे समन्वयक उत्तम कांबळे यांच्यासह अनेक शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक : मंत्री आशिष शेलार
Mumbai
clear sky
26.2
°
C
26.2
°
26.2
°
66 %
5.1kmh
0 %
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
25
°
Fri
25
°

