• पीएमआरडीए पुरस्कृत टेनिस स्पर्धेत २४ देशांतील खेळाडूंचा सहभाग
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) च्यावतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महाओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचा थरार रविवार (दि.२२) पासून रंगणार आहे. ही स्पर्धा १ मार्चपर्यंत म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डेन स्वीनी, गेल्या वर्षीचा ऑस्ट्रेलियन ओपनचा दुहेरीचा विजेता जेसन कुबलर यांसह २४ देशांतील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेतील सामन्यांची वेळ सकाळी ११ वाजल्यापासून असून सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य आहे.
पीएमआरडीएने पाच वर्षांच्या करारांतर्गत ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या स्पर्धेत भारतीय डेव्हिस कप संघातील स्टार टेनिसपटू सुमीत नागलसह अव्वल टेनिसपटूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित केलेल्या तीन एटीपी चॅलेंजर स्पर्धांच्या मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या स्पर्धा चेन्नई आणि दिल्ली येथे पार पडल्या.
भारतीय खेळाडूंना मायदेशात उच्च दर्जाची स्पर्धा उपलब्ध करून देणे हे एमएसएलटीए आणि पीएमआरडीएचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि पाठिंबा देण्याचे मुख्य कारण आहे, असे एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी सांगितले.
पीएमआरडीए चॅलेंजर स्पर्धेचे आयोजन हे महाराष्ट्र राज्यातील टेनिसचा विकास आणि प्रसारासाठी एमएसएलटीएच्या भव्य दृष्टीकोनाचा एक भाग आहे. ही स्पर्धा मुंबई ओपनच्या यशस्वी आयोजनानंतर होत आहे, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
प्रशांत सुतार आणि सुंदर अय्यर पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की खेळाडूंना योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते नक्कीच मोठी झेप घेऊ शकतात. आम्ही यावर सविस्तर चर्चा केली आहे आणि हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे असे आम्हाला वाटते.
सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यासाठी आणखी एक मोठी टेनिस स्पर्धा आयोजित करणे हा अभिमानाचा क्षण आहे. एप्रिल २०२४ मधील बीकेजेसी कप व्यतिरिक्त, गेल्या वर्षापासून मार्च २०२६च्या अखेरपर्यंत एमएसएलटीएने ३.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्पर्धांचे आयोजन केले असेल, जे देशातील सर्वाधिक आयोजनांपैकी एक आहे.
मानांकन यादी खालीलप्रमाणे आहे. १. स्वीनी डेन (ऑस्ट्रेलिया, १५१), २. कुबलर जेसन (ऑस्ट्रेलिया, १७९), ३. जे क्लार्क (ब्रिटन, १८६), ४. गोमेझ फेडेरिको ऑगस्टिन (अर्जेंटिना, १९७), ५. क्रॉफर्ड ऑलिव्हर (ब्रिटन, २१३), ६. सिमाकिन इलिया (२१४), ७. पाव्हलोविक लुका (फ्रान्स, २१९), ८. सिना फेडेरिको (इटली, २२५).
——————————
उद्यापासून महाओपन एटीपी चॅलेंजर स्पर्धेचा थरार
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.4
°
C
26.4
°
26.4
°
69 %
2.9kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°

