• आकाश अंबानी यांनी पंतप्रधानांना दिली जिओच्या एआय इकोसिस्टमची माहिती
कोल्हापूर :
इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिटदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओच्या एआय पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी जिओने विकसित केलेल्या विविध एआय-आधारित मॉडेल्स आणि तांत्रिक सोल्युशन्सची सविस्तर माहिती घेतली.
पंतप्रधानांनी जिओ इंटेलिजन्स, जिओ संस्कृती एआय, जिओ आरोग्य एआय, जिओ शिक्षण आणि जिओ एआय होम यांसारख्या मॉडेल्सची पाहणी केली. या मॉडेल्सचा उद्देश अनुक्रमे एंटरप्राइज इंटेलिजन्स, भारतीय भाषा आणि सांस्कृतिक कंटेंट, हेल्थकेअर सर्व्हिसेस, एज्युकेशन सोल्युशन्स आणि स्मार्ट होम-आधारित एआय फॅसिलिटीज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
यावेळी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी यांनी कंपनीकडून विकसित होत असलेल्या एआय इकोसिस्टमची आणि त्याच्या विविध डायमेन्शन्सची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
जिओकडून दीर्घकाळापासून ‘एआय फॉर ऑल’ या कॉन्सेप्टवर भर देण्यात येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यापूर्वीही नमूद केले आहे की, टेक्नॉलॉजीचा खरा फायदा तेव्हा मिळतो जेव्हा ती मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचते. याच व्हिजनअंतर्गत जिओ ‘एआय फॉर ऑल’ या उपक्रमावर काम करत आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देश-विदेशातील अनेक टेक कंपन्या आणि पॉलिसी एक्स्पर्ट्स सहभागी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जिओ पॅव्हेलियन भेटीमुळे एआय क्षेत्रातील प्रायव्हेट सेक्टरच्या इनिशिएटिव्ह्जकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदींची जिओ पॅव्हेलियनला भेट
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2
°
C
31.2
°
31.2
°
62 %
5kmh
1 %
Mon
31
°
Tue
32
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°

