• विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उदघाटन
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन रविवारी (दि.८)विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल स्डेडियममध्ये झालेल्या या उदघाटन समारंभाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमराणी जे., प्रोजेक्ट हेड व स्पर्धा संयोजक सदानंद सबनीस, तानाजी जाधव यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख उपस्थितीत होते.
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सन २०१८ पासून डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर प्रेसिडेंट कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. डी. वाय. पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी एकूण २८ संघांमध्ये स्पर्धा होत आहे. डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी १८ फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धा विद्युतझोतात होत आहेत.
पृथ्वीराज पाटील व सौ. वृषाली पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होऊन स्पर्धेचा शुभारंभ झाला. या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढेल. सांघिक गुण निर्माण होतील असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांना आपले क्रीडा गुण, कौशल्य दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सदानंद सबनीस व प्रोजेक्ट टीमचे त्यांनी कौतुक केले. सौ. वृषाली पाटील यांनीही यावेळी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धा साखळी पद्धतीने होणार असून ११ दिवस चालणार आहेत. यामध्ये ग्रुपमधील विविध संस्थांचे पुरुषांचे २६ तर महिलांचे ८ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि एबीएस जिम या दोन संघात झाला. हा सामना हॉस्पिटल संघाने जिंकला.
स्पर्धा नियोजनासाठी डॉ. सदानंद सबनीस व प्रोजेक्ट टीम तसेच क्रीडा संचालक शंकर गोनूगडे यांच्यासह सहकारी मेहनत घेत आहेत.
——————————
डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
61 %
2.6kmh
0 %
Tue
26
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

