Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषद

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कसबा बावडा येथे  ६ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत संगणक अभियांत्रिकी, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, सिव्हिल व पर्यावरण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, केमिकल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आदी विविध अभियांत्रिकी शाखांतील नवीन संशोधन प्रवाह, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील मुख्य अतिथी असून डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता कुलगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम, मलेशिया आणि देशभरातील वक्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा. पर्सी इंजिनिअर (सार्वजनिक विद्यापीठ, सुरत), प्रा. मायकेल जॉन (टीसाईड युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम), डॉ. कलावानी चेल्लप्पन ( युनिवर्सिटी केबंग्सन, मलेशिया) व प्रा. निलांजन डे (टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाऊन, कोलकाता) यांचा समावेश आहे.
सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात या परिषदेचे उदघाटन होणार असून मार्गदर्शन व चर्चासत्रे महाविद्यालयात होणार आहेत. संशोधकांना स्कोपस डिजिटल लायब्ररीमध्ये प्रकाशनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉ. मनिषा भानुसे, संयोजक व समन्वयक म्हणून काम पाहत असून प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
30 °
48 %
2.6kmh
10 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page