Homeकला - क्रीडाविश्वनाथ स्पोर्ट्स मीट राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे यश

विश्वनाथ स्पोर्ट्स मीट राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे यश

कोल्हापूर :
एमआयटी, पुणे येथे आयोजित विश्वनाथ स्पोर्ट्स मीट या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत यश मिळवले. आशीष हेगाजे याने रोईंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक तर कबड्डीमध्ये विद्यापीठाच्या पुरुष व महिला संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक प्राप्त केले.
कबड्डी स्पर्धेत महिला संघाने लीग फेरीत सुधाकर जाधवार कॉलेज नहर्रे  संघाला तर उपांत्यपूर्व फेरीत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पुणे संघावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. मात्र मॉडर्न कॉलेज पुणे संघाकडून २५-१८ अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. तर पुरुष संघाने लीग फेरीत वाडिया इंस्टिट्यूट ऑफमॅनेजमेंट संघाला व सुधाकर जाधवार कॉलेज नहर्रे  तर उपांत्यपूर्व फेरीत सी ओ पी पुणे संघाला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. मात्र एम आय टी पुणे संघाकडून ३४-३२ अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे दोन्ही संघांना कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत विद्यापीठाच्या ३३ खेळाडूंनी हॉलीबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, रोइंग आदी खेळांमध्ये सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंना क्रीडा संचालक पूनम खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील,  प्र कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
82 %
8.9kmh
100 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page