Homeशैक्षणिक - उद्योग भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

कोल्हापूर :
७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील आवारात संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्यात आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक प्रकाश पाटील व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक डॉ. सुजित मिणचेकर, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, बिद्री चिलिंग सेंटर कर्मचारी भरत देवर्डेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर येथे कर्मचारी शरद जोशी व मारुती मोकाशी यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक डॉ. चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
52 %
1.7kmh
0 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
27 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page