कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, विविध सहकारी संस्थांचे संस्थापक आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबुराव कदम (अण्णा) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या स्व. दत्ताजीराव कदम अण्णांच्या पूर्णपूर्वी पुतळ्यास अभिवादन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक उद्यानपंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्व. दत्ताजीराव कदम अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजीत अशोक कदम यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णकृती पुतळ्यास संचालक दरगु माने गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव, इंद्रजीत पाटील, शेखर पाटील, ॲड. प्रमोद पाटील, बसगोंडा पाटील, अमर यादव, सुरेश कांबळे, सिदगोंडा पाटील, मलकारी तेरदाळे, मंजूरखान मिस्त्री तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, गेस्ट हाऊस मॅनेजर शक्तीजीत गुरुव, प्रोडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, स्टोरकिपर एस. व्ही. शिंदे, सिव्हिल इंजिनियर जे. के. जंगम, कोजन मॅनेजर विजय इंगळे, पर्यावरण मॅनेजर सुनील पाटील, सिव्हिल ओव्हरसीयर अनिल सुतार, विलास माने, अशोक चौगुले, अजय भोसले कुरुंदवाड, श्रीकांत पाटील, कामगार युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त ग्राहक भांडार या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या जयंतीनिमित्त ‘श्री दत्त साखर’तर्फे अभिवादन
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
60 %
2.1kmh
100 %
Wed
24
°
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°

