कोल्हापूर :
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे संपन्न झालेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत स्पर्धेत तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी शाहीर कु. श्रद्धा तानाजी जाधव हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत तृतीय स्थान पटकावले आहे.
प्रथम वर्ष सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या श्रद्धाने राजधानी दिल्लीत “आई अंबाबाईचा गजर” करत संपूर्ण भारताला डोलायला लावले. या स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक मिळवून तिने कोल्हापूर व महाराष्ट्राचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. श्रद्धा जाधव हिच्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस संचालक डॉ. एस. आर. पावसकर, पॉलिटेक्निक उपप्राचार्या के. एम. पाटील, विभागप्रमुख प्रा. एन. एम. मुल्ला, प्रा. ए. ए. माने तसेच इतर प्राध्यापक व सहकारीनी अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————
राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत स्पर्धेत शाहीर श्रध्दा जाधव देशात तृतीय
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

