Homeकला - क्रीडारंकाळा व सम्राटनगरचे एकतर्फी विजय

रंकाळा व सम्राटनगरचे एकतर्फी विजय

कोल्हापूर :
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळने पाटाकडील तालीम मंडळ (ब) वर ५-० तर सम्राटनगर स्पोर्ट्सने दिलबहार तालीम मंडळवर ४-१ गोलने एकतर्फी विजय मिळवला.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत रंकाळा आणि पाटाकडील (ब) सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. पूर्वार्धात रंकाळा तालीमकडून सौरभ मोहितेने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर झालेल्या चढाईत गोलची आघाडी वाढवू शकले नाहीत. तर पाटाकडील (ब)कडून गोलची परतफेड करण्यासाठी झालेल्या चढाया फिनिशिंगअभावी वाया गेल्या.
उत्तरार्धात मेहराज उदीनने ५२ व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर सोहम निकमने गोल करून ५५ व्या मिनिटाला आघाडी ३-० अशी भक्कम केली. अखेर पी. सी. कृष्णराज याने ६१ व्या आणि ७६ व्या मिनिटास गोल नोंदवून संघाची आघाडी ५-० अशी केली. पाटाकडील (ब)कडून रोहन कांबळे, यश मुळीक, युनूस पठाण, सार्थक राऊत यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही.
सम्राटनगर विजयी…
सम्राटनगर आणि दिलबहार यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सम्राटनगरकडून झालेल्या चढाईत ४२ व्या मिनिटाला यश मिळाले. मोहम्मद मकानदार याने दिलेल्या पासवर सोहम साळोखेने गोल नोंदवला. १-० ची ही आघाडी फारवेळ टिकली नाही. दिलबहारकडून झालेल्या चढाईत फेबिन गिब्सच्या पासवर स्वयंम साळोखेने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर सम्राटनगरकडून युनूस नदाफने दिलेल्या पासवर निरंजन कामतेने गोल करून आघाडी २-१ अशी वाढवली. ६० व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर ६३व्या मिनिटास पठाणने दिलेल्या पासवर अथर्व पाटीलने गोल करून आघाडी ३-१ वर नेली. अखेर जादावेळेत मोहित घोरपडेने गोल नोंदवून संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला.
          ———
९ खेळाडूंना तीन सामन्यांची बंदी…
सोमवारी (दि.१९) फुलेवाडी आणि झुंजार क्लब यांच्यातील सामन्यात उत्तरार्धात खेळाडूंमध्ये वादावादी झाली व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये फुलेवाडीच्या शाम कुमार, उत्तम राय, लेनिन, आदित्य तोरस्कर यांना तर झुंजार क्लबच्या निखिल डकरे, शाहू भोईटे, समर्थ नवाळे, अथर्व सावंत, दुर्गेश भोईटे यांना मुख्यपंच गौरव माने यांनी रेडकार्ड दाखवत कारवाई केली आहे. या ९ खेळाडूंना पुढील तीन सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियम क्रमांक २७ जी नुसार दोन्ही संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. ——————————————————-
आजचे सामने…
• प्रॅक्टीस – सुभाषनगर : दुपारी १:३० वा.
• वेताळमाळ – बालगोपाल : दुपारी ४ वा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
42 %
3.1kmh
20 %
Thu
28 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page