कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते व भाजपा मंगळवार पेठ मंडल सरचिटणीस गणेश महादेव चिले हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून ओबीसी महिला प्रवर्गसाठी सौ. गीता गणेश चिले यांच्या उमेदवारीसाठी भाजपाकडे मागणी अर्ज केलेला आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२०) सायंकाळी सौ. गीता गणेश चिले यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आला.
मंगळवार पेठेतील जासूद गल्ली येथील महादेव मंदिर येथे भागातील जेष्ठ नागरिक व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार शुभारंभ झाला. यावेळी प्रभागातील महिलांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर गणेश चिले व सौ. गीता गणेश चिले यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागातून पायी प्रचार रॅली काढली. हलगीच्या कडकडाटात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीतून गणेश चिले व सौ. गीता गणेश चिले यांनी प्रभागातील नागरिकांची भेट घेऊन माहिती पत्रक देत आपले कार्य व उमेदवारी संदर्भाने संवाद साधला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना ‘विजयी भव असे आशीर्वाद दिले. या प्रचार शुभारंभ रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह महिला व भागातील नागरिक सहभागी झाले होते.
सौ. गीता गणेश चिले यांच्या प्रचाराची रॅली विविध मंडळांचे कार्यकर्ते व महिलांच्या उपस्थितीत शाहू बँक चौक, नंगिवली तालीम मंडळ परिसर, बजापराव माने तालीम मंडळ, पोवार गल्ली, कॅसेट ग्रुप, कराळे बोळ, शिंदे गल्ली, बिनधास्त तरुण मंडळ सिद्धाळा गार्डनची मागिल बाजू, डाकवे गल्ली, कोण्णूर गल्ली, जरग गल्ली या भागातून काढण्यात आली. या रॅलीला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौ. गीता चिले यांच्या प्रचाराचा शुभारंभ
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
22 %
3.6kmh
16 %
Tue
32
°
Wed
28
°
Thu
27
°
Fri
26
°
Sat
26
°

