कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व विफाच्या महिला फुटबॉल समिती अध्यक्ष सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार कोल्हापूरात प्रथमच घेण्यात आलेली फुटबाल मॅच कमिशनर कार्यशाळा उत्साहात पार पडली. छत्रपती शाहू स्टेडियम येथे दोन दिवसांची कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.
फुटबॉल सामने नियमानुसार व शांततेत पार पाडणेसाठी सामन्यांवर संपूर्णपणे निरीक्षणाकरिता मॅच कमिशनर यांची भूमिका अत्यंत महत्त्त्वाची आहे. ही भूमिका लक्षात घेऊनच या कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे इनस्ट्रक्टर व महाराष्ट्र सॉकर रेफ्री बोर्डचे प्रमुख धनराज मोरे यांनी मॅच कमिशनर यांची मुख्य भूमिका, सामना काऊंटडाऊनप्रमाणे घेणे, संघ व खेळाडू नांवांची यादी, पंच, ॲम्बुलन्स, मैदान इत्यादीची संपूर्ण पाहणी तसेच एआयएफएफ सीएमएस ऑनलाईन पोर्टलवर फुटबॉल सामनासंबंधीत महत्त्वाची सर्व माहिती भरणे व त्यानुसार रिपोर्ट तयार करणे यांची माहिती प्रोजेक्टद्वारे देणेत आली व त्यांचे प्रॅक्टीकल फुटबॉल लिग सामन्यावेळी घेण्यात आले.
कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील नितीन जाधव, दिपक घोडके, प्रो. अभिजीत वणीरे, दिपक कुपन्नावर, युवराज पाटील, रविंद्र शेळके, अमित साळोखे, संजय चिले, अमित शिंत्रे, निखिल सावंत, गजानन मनगुतकर, रोहित मंडलिक, सुरज शेळके, संदीप पाटील या प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.
याप्रसंगी सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींना मॅच कमिशनर म्हणून उत्तम कामकाज करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व कार्यकारिणी सदस्य नितीन जाधव, संभाजीराव पाटील-मांगोरे, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दिपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते.
——————————
केएसएतर्फे फुटबॉल मॅच कमिशनर कार्यशाळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
8kmh
99 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

