Homeराजकियकोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू : व्ही. बी. पाटील

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू : व्ही. बी. पाटील

• राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करुन मानवतेचा संदेश देत वाढदिवस साजरा केला. यावेळेस विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रार्थना म्हणून शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमानंतर पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून तसेच शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी संदेश दिला की, या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याच्या कामात सर्वांनी झोकून देऊन कामास लागावे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. निरंजन कदम यांनी आभार मानले. यावेळी बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, गणेश जाधव, गणेश नलावडे, सुरेश कुरणे, महादेव पाटील, रियाज कागदी, सोहेल बागवान, लहू शिंदे, फिरोज उस्ताद अरुणा पाटील छाया नलवडे नागेश शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
80 %
8kmh
100 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page