Homeकला - क्रीडाकरण चव्हाण-बंदरे, विशाल पाटील व प्रभू पोवार यांची संतोष ट्रॉफीसाठी निवड

करण चव्हाण-बंदरे, विशाल पाटील व प्रभू पोवार यांची संतोष ट्रॉफीसाठी निवड

कोल्हापूर :
७९ वी नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर संतोष ट्रॉफी सहभागी महाराष्ट्र राज्य पुरूष फुटबॉल संघामध्ये केएसएचे खेळाडू करण रविंद्र चव्हाण-बंदरे, विशाल वसंतर पाटील व प्रभू सुरेश पोवार या खेळाडूंची निवड झाली आहे.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने ७९वी नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर संतोष ट्रॉफी, ग्रुप-आयचे सामने राजस्थान येथील जयपूर येथे १७ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहेत. महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्यावतीने मुंबई कुपरेज फुटबॉल ग्राऊंड येथे निवड चाचणी शिबीर घेण्यात आले. या निवड चाचणीसाठी नागपूर येथे झालेल्या इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशीपमधून केएसएच्या ७ खेळाडूंची निवड झाली होती.
या निवड चाचणी शिबीरामधून करण रविंद्र चव्हाण-बंदरे (स्ट्रायकर, श्री शिवाजी तरूण मंडळ), विशाल वसंत पाटील (डिफेन्स, श्री शिवाजी तरूण मंडळ) व प्रभू सुरेश पोवार (स्ट्रायकर, खंडोबा तालीम मंडळ) या तीन खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य पुरूष फुटबॉल संघामध्ये झालेली आहे. ते महाराष्ट्र संघाकडून कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या तीन खेळाडूंना केएसएचे पेट्रन – इन – चीफ खासदार शाहू छत्रपती महाराज, पेट्रन मेंबर संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले. केएसए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
30.9 °
37 %
8.2kmh
3 %
Sat
32 °
Sun
29 °
Mon
31 °
Tue
30 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page