कोल्हापूर :
प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तथा सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर, जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळ शेती विभाग यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड व ग्रामीण रुग्णालय शिरोळ यांच्या सहकार्याने कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी ऊसतोड कामगारांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार तसेच गर्भवती महिलांची तपासणी, रक्त तपासणी साखरशाळा येथे करण्यात आली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन ढोणे, ग्रामीण रुग्णालय शिरोळच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. व्ही. डी. चव्हाण, श्री दत्त आरोग्य केंद्र प्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील, सीएचओ डॉ. विवेकानंद हंकारे, डॉ. सॅमसन सावनोर, श्रीमती वर्षा लोखंडे यांनी ८० हुन अधिक ऊसतोड मजुर, महिला व बालकांची तपासणी करुन औषधोपचार केले.
शिबिरासाठी औषध निर्माण अधिकारी आशिष कुरणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती दिपाली शेटे, रूपाली खोंद्रे, आरोग्य सहाय्यक जमीर नदाफ, यास्मिन खान, अश्विनी मधाळे , आरोग्य सेवक राजेश भांडवले, आरोग्य सेविका व्ही. ए. चुडमुंगे, के. व्ही. भोसले, के. बी. करे, एस. एन. कलावंत, शांताराम लांडे, सुनील कांबळे, कारखाना आरोग्य सेवक श्रीकांत निर्मळे, कारखाना आरोग्य केंद्र स्टाफ नर्स किशोर कांबळे, शिपाई अनिल कोळी, वाहन चालक नामदेव रेळेकर, अंबुलन्स ड्रायव्हर रमेश गाडवे यांचे सहकार्य लाभले.
आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, अमर चौगुले, केनयार्ड सुपरवायझर रावसाहेब गस्ते, शिफ्ट इंचार्ज सुनील खांडेकर यांचे सहकार्य मिळाले.
——————————
श्री दत्त साखर शिरोळ कार्यस्थळावर ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
42 %
4.6kmh
5 %
Thu
29
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

