Homeकला - क्रीडापाटाकडीलकडून वेताळमाळ पराभूत

पाटाकडीलकडून वेताळमाळ पराभूत

• प्रॅक्टीस क्लबचा संध्यामठवर विजय
कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने वेताळमाळ तालीम मंडळवर २-०ने मात केली. या विजयासह पाटाकडील (अ) चे तीन सामन्यात एकूण ७ गुण झाले. तर प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने संध्यामठ तरुण मंडळवर २-० गोलने विजय मिळवून तीन गुणांसह खाते उघडले. संध्यामठचा हा सलग तिसरा पराभव झाला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात पाटाकडील (अ) आणि वेताळमाळ या तुल्यबळ संघातील सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची मोठी उपस्थिती होती. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. वेताळमाळच्या शोएब बागवानने मोठ्या डीमधून मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक अमर गवळीने तितक्याच तत्परतेने चेंडूला पंच करून बाहेर काढून गोलचे संकट टाळले. सर्वेश वाडकरच्या पासवर लायटॉनजाम मिताईने गोलची सोपी संधी दवडली. पाटाकडीलकडून ओमकार मोरेने दिलेल्या पासवर प्रतिक बदामेने गोलची संधी गमावली.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. वेताळमाळकडून सर्वेश वाडकर, शोएब बागवान, मिताई, आकाश मोरे, आकाश माळी यांनी केलेल्या चढाया दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. पाटाकडील (अ)च्या ओमकार मोरे, प्रथमेश हेरेकर, यशराज कांबळे, यश देवणे, रोहित पवार, नबी खान, ऋषिकेश मेथे-पाटील यांनी खोलवर चाली रचल्या, त्यामध्ये ५८व्या मिनिटाला यश मिळाले. प्रथमेश हेरेकरने गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या दिग्विजय बसरगेने ६८व्या मिनिटास गोल करून संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. वेताळमाळच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत गोलची परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर २-०ची आघाडी राखून पाटाकडीलने विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रॅक्टीसचा पहिला विजय…
तत्पूर्वी दुपारच्या सत्रात प्रॅक्टीस क्लब आणि संध्यामठ संघादरम्यान सामना झाला. यामध्ये सूरज जाधवने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर प्रॅक्टीस क्लबने पहिल्या विजयाला गवसणी घातली. पूर्वार्धात ३३व्या मिनिटाला सूरज जाधवने गोल करून आघाडी मिळवून दिली. तसेच उत्तरार्धात ५२व्या मिनिटाला वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल नोंदवला.
संध्यामठकडून कपील शिंदे, अभिजीत साळोखे, करणसिंह पाटील, आदित्य रोटे, आशिष पाटील, सुलतान शेख यांनी चांगला खेळ केला पण ते गोलची परतफेड करू शकले नाहीत. प्रॅक्टीस क्लबच्या साहिल डाकवे, सचिन गायकवाड, आकाश बावकर, ओम पवार, सूरज जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला.
——————————————————-
आजचे सामने…
• झुंजार क्लब – पीटीएम (ब): दु. १:३० वा.
• खंडोबा – दिलबहार : दु. ४ वाजता
——————————————————-
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
47 %
0kmh
20 %
Thu
27 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page