कोल्हापूर :
महाराष्ट्र शासन – स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवाकरीता केएसएचे १३ वर्षाखालील फुटबॉल खेळाडू आर्यन सचिन पोवार, आराध्य नागेश चौगले, रूद्र मकरंद स्वामी व दिव्या सतिश गायकवाड, साक्षी संदीप नावळे यांची निवड झाली.
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, सिडको, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व महिला फुटबॉल समिती अध्यक्ष सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष सहकार्याने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने १३ वर्षाखालील मुले व मुली यांच्याकरिता स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवा ही महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात आली. या स्कॉलरशिप प्रोजेक्टसाठी राज्यातील ३० मुले व ३० मुली यांची मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीतून करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आर्यन सचिन पोवार (महाराष्ट्र हायस्कूल), आराध्य नागेश चौगले (महाराष्ट्र हायस्कूल), रूद्र मकरंद स्वामी (सेंट झेवियर्स हायस्कूल) या मुलांची तर दिव्या सतिश गायकवाड (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी), साक्षी संदीप नावळे (श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी) या मुलींची निवड झालेली आहे.
महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाच्या वतीने या मुलांना व मुलींना स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत पूढील पाच वर्षासाठी त्यांचे संपूर्णपणे पालकत्व घेण्यात येणार असून त्यांचे शिक्षण, फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण व निवासाची व्यवस्था यांची जबाबदारी घेतलेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करून भारत देशाचे नांव उज्ज्वल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना संधी उपलब्ध केलेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस व कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशन यांच्यावतीने जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय निवड चाचणी छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ७ मुले व ६ मुली यांची विभागीय निवड चाचणीतून राज्यस्तरीय निवड चाचणीकरिता निवड करण्यात झालेली होती.
——————————
प्रोजेक्ट महादेवासाठी आर्यन, आराध्य, रूद्र, दिव्या, साक्षी यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
17 %
4.1kmh
0 %
Thu
32
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
28
°

