Homeराजकियदेशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार

देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार

• खा. धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत सादर झाले विधेयक
कोल्हापूर :
नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक सादर केले. त्यानुसार आता देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक मांडले. देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला समान क्रीडा हक्क मिळावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासह सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास व्हावा, यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करावे, हे विधेयक मंजूर करण्यात आले.
खासदार धनंजय महाडिक यांनी मांडलेल्या या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल. मैदान, खेळाची साधने, प्रशिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणारे हे विधेयक आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर, देशभरातून अनेक खेळाडू घडतील आणि क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा जागतिक पातळीवर वाढेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
80 %
1.9kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page