Homeकला - क्रीडामनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपद

मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपद

कोल्हापूर :
मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मेरी वेदर कोल्हापूर येथे झालेल्या महानगरपालिकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज कोल्हापूर च्या १९ वर्षाखालील (मुले) क्रिकेट संघाने चाटे ज्युनिअर कॉलेज, महावीर कॉलेज आणि कॉमर्सचा पराभव करीत या स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख व प्रशिक्षक प्रा. संतोष कुंडले, प्रा. साद मुजावर, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
53 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
25 °
Tue
25 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page