Homeशैक्षणिक - उद्योग सहकार सप्‍ताहनिमित्त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

सहकार सप्‍ताहनिमित्त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

कोल्‍हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ७२व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्ताने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६व्या जयंती निमित्त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले.
यावेळी स्वागत प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले. आभार डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले. याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, डॉ. प्रकाश दळवी, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, संघाचे इतर अधिकारी, महिला स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
76 %
8kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page