Homeकला - क्रीडाशिवराज जाधव, शनाया पाटील, मायरा टोपणो यांचा मुख्य फेरीत प्रवेश

शिवराज जाधव, शनाया पाटील, मायरा टोपणो यांचा मुख्य फेरीत प्रवेश

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शिवराज जाधव, शनाया पाटील, मायरा टोपणो यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.
येथील केडीएलटीए टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या नरेश प्रभू याने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या त्रिशिक वाकलकरचा ४-६, ६-३, १०-८ असा तीन सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या शिवराज जाधवने तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या गौतम वेंकटेशचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
मुलींच्या गटात शनाया पाटील याने अव्वल मानांकित रितू ग्यानचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित मायरा टोपणोने अनुष्का जोगळेकरचा ६-१, ६-४ असा पराभव केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
76 %
8kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page