Homeशैक्षणिक - उद्योग केडीसीसी बँकेकडे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी जमा

केडीसीसी बँकेकडे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी जमा

• मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांची माहिती
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेकडे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध ठेव योजनांमध्ये ३३ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बँकेच्या सर्वच ठेव योजनांना ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने बुधवारी दि. २२ रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशीही ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेच्या केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह सर्व म्हणजे १९१ शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेकडे सुरू असलेल्या सर्वच ठेव योजनांना चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्दिष्ट रु. १२ हजार कोटी ठेवींचे…
केडीसीसी बँकेने दि. ३१ मार्च २०२५ अखेर रुपये १०,६३५ कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे रुपये १२,००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28 ° C
28 °
28 °
64 %
5.2kmh
0 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page