Homeसामाजिकश्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

कोल्हापूर :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान करण्यात आले. मयत झालेल्या चार सभासदाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे विमापॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आले.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखान्याच्यावतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास ५० हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे  मिळते. विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले शौकत कादर देसाई अब्दुललाट यांचे वारस बाबासो अण्णा चौगुले शिरदवाड यांचे वारस, सुधाकर बसगोंडा पाटील जुगुळ, महादेव रामा पाटील घोसरवाड यांचे वारस असे चार सभासदाच्या वारसांना चार लाख रुपये  विमापॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आले.
आजअखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे १०३ सभासदांच्या वारसांना एक कोटी तीन लाख रुपये व हात पाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे असे एकूण १०६ सभासदांना आत्तापर्यंत एक कोटी चार लाख ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
सदरचा चेक प्रधान कार्यक्रमात गणपतराव पाटील दादा, चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव, इंद्रजीत पाटील, विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संजय भोसले मॅनेजर फायनान्स, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे, पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उप महाप्रबंधक एच. बी. अरुण कुमार, रश्मी पिसाळ, मृणाल उरुणकर, राधिका पाटील, रोहन खाडीलकर, शुभम कदम, नितीन पाटील विशेष सहकार्य मिळाले. तसेच कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मेस्त्री इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
79 %
7.9kmh
15 %
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page