Homeशैक्षणिक - उद्योग भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्यावतीने आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्यावतीने आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर :
भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्यावतीने अनेक शाळांमध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेतली जात आहे. त्यातून मुलांना नवनर्मितीचा आनंद मिळेल, तसेच प्लास्टिक मुक्त भारत घडवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे, असे भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक यांनी नमुद केले. करवीर तालुक्यातील वाशी येथील प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या आकाश कंदील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
दिवाळी प्लास्टिक मुक्त व्हावी, यासाठी भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन यांच्यावतीने कागदापासून आकाश कंदील निर्मितीचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. करवीर तालुक्यातील वाशी येथील प्राथमिक शाळेमध्ये आकाश कंदील निर्मितीची कार्यशाळा झाली. सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ झाला. मुख्याध्यापक सुनील कारंजकर यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे नमुद केले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन मेहता यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. वाशी ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष रानगे यांनी भागीरथी संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.
दरम्यान या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक आणि आकर्षक आकाश कंदील बनवले. प्रशिक्षक म्हणून सुहास प्रभावळे यांनी काम पाहिले. यावेळी सारिका रानगे, अरुण कांबळे, कृष्णात पाटील, संतोष रानगे, किशोर बठेजा, अशोक पाटील, तानाजी शेंडगे, गोरखनाथ पाटील, विकास राऊत, ऋषिकेश जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
28 ° C
28 °
28 °
78 %
2.1kmh
20 %
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page