कोल्हापूर :
ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंट लिमिटेड (पूर्वीचे महिंद्रा गुजरात ट्रॅक्टर लिमिटेड), जे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात सरकार यांच्यातील संयुक्त उद्यम आहे. यांनी 4WD आणि 2WD कॅटेगिरीमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. यामध्ये भारतातील पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज (सब- 50 HP सेगमेंट) समाविष्ट आहे.
ग्रोमॅक्सच्या दमदार आणि इंधन-कार्यक्षम डिझेल इंजिन्स तसेच जागतिक दर्जाच्या गिअरबॉक्स तंत्रज्ञानावर चालणारे हे नवे ट्रॅक्टर उच्च परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात आणि वापरण्यास सोपे आहेत. हे ट्रॅक्टर बागायती शेती, सुपारी शेती, इंटर-कल्टिव्हेशन, पडलिंग आणि हॉलज यांसारख्या विविध शेती गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
ट्रॅकस्टार कवच सिरीज अंतर्गत, ग्रोमॅक्सने सब- 50 HP सेगमेंटमध्ये भारताची पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज सादर केली आहे. ही सिरीज शेतकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि हवामान-प्रतिरोधक कार्यक्षेत्र उपलब्ध करून देते. या कॅबिनमुळे वर्षभर शेती कामे सुलभ होतात आणि उत्पादकता वाढते. कंपनी सुरुवातीला नॉन-एअर कंडिशन्ड व्हेरिएंट उपलब्ध करून देणार असून, पुढील टप्प्यात एअर कंडिशन्ड व्हेरिएंटही बाजारात आणला जाणार आहे.
या नव्या ट्रॅक्टरशिवाय, ग्रोमॅक्सने आपल्या सबसे सही चुनाव कॅम्पेनअंतर्गत दुसरा डीव्हीसीही (डिजिटल व्हिडिओ कमर्शियल) लॉन्च केला आहे. या नव्या मोहिमेत ग्रोमॅक्सची उत्पादने परफॉर्मन्स, उत्पादकता आणि नफा या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी परवडणारी आणि योग्य निवड असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
लॉन्चच्यावेळी फार्म इक्विपमेंट बिझनेस, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे प्रेसिडेंट विजय नाकरा म्हणाले की, ग्रोमॅक्समध्ये आमचे ध्येय म्हणजे भारतीय शेतीच्या बदलत्या गरजांना अनुरूप, विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून मॅक्सिमम ग्रोथ साध्य करणे. एका दिवसात 8 नवे ट्रॅक्टर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. प्रत्येक ट्रॅक्टर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादनक्षमतेसाठी सक्षम बनवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंटकडून विविध एचपी कॅटेगिरींमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

