कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय टेबल टेनिस पुरुष संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
विवेकानंद महाविद्यालय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर मात करून प्रथम क्रमांक मिळविला. संघाची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे होणाऱ्या इंटरझोनल टेबल टेनिस स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
विवेकानंद महाविद्यालय टेबल टेनिस पुरुष संघा अनिष सोनटक्के – बी.कॉम. भाग ३, भव्य शाह – बी.कॉम. भाग ३, आदर्श पाटील – बी. ए. भाग २, ऋषिकेश नलवडे – एम.कॉम. भाग १, समर्थ चव्हाण – बी.एस.सी. सी.एस. भाग २ यांचा समावेश होता.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले व प्रोत्साहन दिले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ.श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

