• दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी
१३६ कोटी ३ लाख होणार जमा
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्याकाळात देण्याची परंपरा आहे. गोकुळतर्फे याच परंपरेतून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल १३६ कोटी ३ लाख रुपयाची उच्चांकी रक्कम दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. गतसालापेक्षा दूध उत्पादकांना २२ कोटी ३७ लाख रुपये जादा मिळणार आहेत. हिच गोकुळकडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली स्नेहपूर्ण दीपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.
चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये दि. १/४/२०२४ ते ३१/३/२०२५ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी १ रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर २० पैसे व गाय दुधास प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला आहे व तो वरील दर फरकामध्ये समाविष्ठ आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ६६ कोटी ३७ लाख ७० हजार रुपये तर गाय दूधाकरीता ४५ कोटी १४ लाख ८ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ५ कोटी ५२ लाख ८९ हजार व डिंबेचर व्याज ७.८०% प्रमाणे १० कोटी ६७ लाख ३५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी ३८ लाख ६९ हजार रूपये असे एकूण १३६ कोटी ३ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे, अशी भावना चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळ संलग्न ८ हजार १२ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दीपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदाना आदा करून सभासदांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चेअरमन श्री. मुश्रीफ यांनी केले.
यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट!
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
38 %
0kmh
0 %
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°

