कोल्हापूर :
पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा विळखा पडला आहे. त्यातून प्रापंचिक साहित्याचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांसाठी भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मंगळवारी सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट घेवून ट्रक रवाना झाला. सुमारे ५० लाख रूपये खर्चुन मानवतेच्या भावनेतून भाजप आणि महाडिक परिवाराने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पूरग्रस्तांना उपयोगी ठरेल असे दैनंदिन वापराच्या वस्तूंचे कीट बनवण्यात आले आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, कडधान्य, चटणी, मीठ, टूथपेस्ट, ब्रश, विविध प्रकारचे मसाले, साबण, ब्लँकेट, औषध – गोळ्या असे साहित्य आहे. सुमारे दीड हजार नागरिकांसाठी ही कीट मंगळवारी कोल्हापुरातून रवाना झाली.
आमदार अमल महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यासह महाडिक परिवार, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रदीप उलपे, राजसिंह शेळके, भगवानराव काटे, विजयसिंह खाडे, भैय्या शेटके, संग्राम निकम, संजय निकम, विलास वास्कर, मारुती माने, चंद्रकांत घाटगे, महेश वासुदेव, रूपाराणी निकम, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके यावेळी उपस्थित होते.
दोन ट्रकमधून मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना हे साहित्य पाठवण्यात आले. पुढील टप्प्यात चादर, ब्लँकेट, जाजम, कपडे यासह जनावरांसाठी चारा पाठवण्याचे नियोजन असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले. तसेच राज्य शासन पातळीवरून पुरग्रस्तांना मदत दिली जाईल, असेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भाजपा आणि खा. धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट रवाना
Mumbai
haze
29
°
C
29
°
29
°
74 %
3.1kmh
20 %
Wed
29
°
Thu
32
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°