कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९ वीचा विद्यार्थी विहान सौरभ लड्डा याने साऊथ झोन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावले. साऊथ झोन अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ व आंध्र प्रदेश या पाच राज्यातील सीबीएसई स्कूलमधील खेळाडूंची निवड होत असते. विहानची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ११ खेळाडूंच्या संघामध्ये निवड झाली. गतवर्षी त्याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते.
शालेय स्तरावर सतत उत्तम कामगिरी करणाऱ्या विहानने साऊथ झोन संघाचे प्रतिनिधित्व करताना आपली चमकदार फलंदाजी आणि उत्तम खेळकौशल्य दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले.
क्रीडा क्षेत्रात सातत्य व मेहनतीच्या जोरावर अशाच प्रकारे आणखी मोठी कामगिरी विहानने करावी, अशी अपेक्षा संचलिका सास्मिता मोहंती यांनी व्यक्त केली.
शाळेचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य अस्कर अली, माध्यमिक उपप्राचार्य नितीन माळी, प्राथमिक उपप्राचार्या अर्चना पाटील, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, प्रशिक्षक संदीप बिरंजे, प्रशिक्षक सुयोग वाडकर तसेच सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी विहानचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विहानची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
haze
28
°
C
28
°
28
°
78 %
2.1kmh
20 %
Thu
32
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
29
°