Homeकला - क्रीडाविवेकानंद काॅलेजच्या महिला व्हॉलीबॉल संघाची इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड

विवेकानंद काॅलेजच्या महिला व्हॉलीबॉल संघाची इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व जनता शिक्षण मंडळ देवचंद कॉलेज, अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संघाची वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आयक्युएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.7 ° C
28.7 °
28.7 °
63 %
2.2kmh
0 %
Tue
30 °
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

You cannot copy content of this page