कोल्हापूर :
मुंबई इंडियन्सने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दोनवेळा विश्वचषक विजेत्या लीसा काइटली यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
१९९७ आणि २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेल्या लीसा काइटली या महिला क्रिकेटमधील आदरणीय प्रशिक्षकांपैकी एक मानल्या जातात. खेळाडू म्हणून त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि जागतिक दर्जाच्या अनेक प्रमुख लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून मिळवलेला अनुभव, मुंबई इंडियन्स महिला संघाला अप्रतिम दृष्टीकोन व समृद्धी प्रदान करणार आहे. आधीच डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलेल्या मुंबई इंडियन्स महिला संघाने फक्त तीन हंगामांत दोनवेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२३ आणि २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल किताब जिंकला होता.
या निमित्ताने नीता एम. अंबानी म्हणाल्या की, मुंबई इंडियन्स परिवारात लीसा काइटली यांचे स्वागत करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. लीसाने आपल्या उत्कटतेने क्रिकेटच्या अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांचा प्रवेश हा मुंबई इंडियन्ससाठी रोमांचक आणि नवा अध्याय ठरणार आहे, कारण आता आम्ही आणखी उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहोत.
लीसा काइटली म्हणाल्या की, मुंबई इंडियन्समध्ये सामील होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. डब्ल्यूपीएलमध्ये या संघाने अनेक मापदंड स्थापित केले आहेत. संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.
——————————————————-
मुंबई इंडियन्स महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी लीसा काइटली
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.6
°
C
28.6
°
28.6
°
75 %
4.6kmh
0 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

