कोल्हापूर :
शारदीय नवरात्रौत्सवात पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्री कमलालक्ष्मी माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेच्या सलामीने मंदिरात परंपरेप्रमाणे घटस्थापना झाली. नवरात्रौत्सवात देवीच्या दररोज सालंकृत पूजा बांधल्या जातील. पहिल्या दिवशी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्री कमलालक्ष्मी माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपुजक बाबुराव ठाणेकर, प्रसाद लाटकर व योगेश जोशी यांनी बांधली.
‘महाविद्या श्री कमलालक्ष्मी माता’ रुपातील पूजेचे स्वरूप असे – सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती-वर्ण असून, ही देवी दिव्य अलंकाराने तेजस्वी व अनुपम सुंदर दिसत आहे. तिने वरील दोन्ही हातात कमळ धारण केली असून, खालील दोन्ही हात वरदायक व अभयकर आहेत. ही कमळात बसली असून, हत्तींनी वेष्टिलेली आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे, हिचा सदाशिव नारायण महाविष्णू असून, ही श्रीकुलातील देवी, दक्षिणाम्नायपीठस्था आहे.
देव व असुरांनी जेव्हा समुद्र मंथन करण्याचे नियोजन केले, तेव्हा मंदार पर्वताची घुसळण (रवी) व वासुकी नागाची दोरी करून, त्यांनी समुद्र घुसळण्यास आरंभ केला. तेव्हा श्रीकमलालक्ष्मी ही पहिली देवतारत्न मार्गशीर्ष अमावस्येस प्रगट झाली. यानंतर अन्य तेरा रत्ने पुढे प्रगट झाली. ही कमला जेव्हा प्रगटली तेव्हा तिच्या तेजाने चराचर दीप्तमान झाले, सर्व दिशा, देवता अत्यंत आनंदित झाले, त्यावेळी दिग्गजांनी (चार दिव्य गजांनी) तिला अमृत भरलेल्या सुवर्ण घटांनी स्नान घातले.
श्री अंबाबाईची ‘महाविद्या श्री कमलालक्ष्मी माता’ रुपात पूजा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

