Homeकला - क्रीडाराज्य थांग - ता अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरला १५ पदके

राज्य थांग – ता अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरला १५ पदके

कोल्हापूर :
२९वी राज्यस्तरीय थांग-ता अजिंक्यपद – २०२५ स्पर्धा परतवाडा जिल्हा अमरावती येथे दि. १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशन कोल्हापूर च्या संघाने स्टाईल वन व स्टाईल टू या प्रकारामध्ये २ सुवर्ण, ३ रौप्य व १० कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले.
थांग – ता असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न व इंडियन ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया खेलो इंडिया ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मान्यता प्राप्त ऑल महाराष्ट्र थांग – ता असोसिएशन यांच्यावतीने आयोजित २९वी राज्यस्तरीय थांग-ता स्पर्धा परतवाडा जिल्हा अमरावती येथे झाली. या स्पर्धेमध्ये इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशन कोल्हापूर च्या संघाने स्टाईल वन व स्टाईल टू या प्रकारामध्ये २ सुवर्ण, ३ रौप्य व १० कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवली.
या स्पर्धेत सब जुनियर गटात स्टाईल वन (फुनाबा अमा) : रुद्र संतोष यादव – सुवर्ण, श्रीयश अमोल मालवदे – कांस्यपदक. स्टाईल टू (फुनाबा अनिशुबा) : अक्षय अमोल बंडगर – कास्य, सिद्धेश मधुकर जाधव – कांस्यपदक.
ज्युनिअर गटात – स्टाईल वन (फुनाबा अमा) : रजत रवींद्र पेटकर, पियुष विकास खोत, अथर्व भरत धनवडे, अथर्व अमित चौगुले सर्व कांस्यपदक तर ओम नितीन राऊतने रौप्यपदक पटकावले. स्टाईल टू (फुनाबा अनिशुबा) : निशांत प्रमोद लाड- कास्य, सोहम संदीप राऊत – रौप्य, आर्यन प्रशांत माळी- कास्य, अविराज विकास सरगर – कास्य, शौर्य अजित चौगुले- रौप्य, पार्श्व नितीन चौगुले- सुवर्णपदक पटकावले.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रेम भोसले, सचिव सतीश वडणगेकर, संस्थापक ए. बी पाटील, प्रशिक्षक विश्वनाथ जांभळे, कृष्णात कांबळे, शहानवाज नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
21 ° C
21 °
21 °
52 %
1.5kmh
0 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page