• बदलत्या बँकिंगचा केला अभ्यास
कोल्हापूर :
मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळासह लंडन आणि स्कॉटलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी लंडनस्थीत ‘लंडन बिझनेस स्कूल’ या जागतिक दर्जाच्या संस्थेस अभ्यासभेट दिली. या अभ्यासभेटीत परदेशामध्ये असलेल्या बँकिंग सेवासुविधा, कर्ज देण्याची व वसुलीची कार्यपद्धत, डिजिटल बँकिंग, ग्राहकांना घरबसल्या मिळणाऱ्या बँकिंग सुविधा आदी विषयांचा अभ्यास संचालकांनी केला.
याबाबत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लंडनमध्ये वसलेली लंडन बिझनेस स्कूल ही जागतिक पातळीवरील एक नामांकित सुप्रसिद्ध संस्था आहे. विशेषतः वित्त, व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये संपूर्ण जगभर या संस्थेचे नाव अग्रभागी आहे. वेगाने बदलणाऱ्या बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेला भेट दिली.
यावेळी माजी आम. के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, बँकेचे उपाध्यक्ष माजी आ. राजूबाबा आवळे, आ. डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खा. प्रा. संजयदादा मंडलिक, माजी आ. राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, राजेश पाटील, माजी संचालक असिफ फरास, युवराज गवळी, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी उपस्थित होते.
लंडन बिझनेस स्कूलला मंत्री मुश्रीफ व केडीसीसीच्या संचालकांची भेट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
39 %
2.6kmh
0 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°

