कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व विद्या प्रसारक मंडळ संचलित डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटरझोनल योगा स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर मधील बी.बी. ए. भाग १ चा विद्यार्थी श्रीनंदन मधुसूदन मालपाणी याने द्वितीय क्रमांक पटकावला. श्रीनंदन मालपाणी याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेकरिता विद्यापीठाच्या संघात स्थान निश्चित केले.
श्रीनंदन मालपाणी याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
विवेकानंदच्या श्रीनंदन मालपाणी याचे योगा स्पर्धेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

