Homeसामाजिक एक पाऊल निसर्गाकडे उपक्रमातून ८२ पोती शाडूची माती जमा

 एक पाऊल निसर्गाकडे उपक्रमातून ८२ पोती शाडूची माती जमा

कोल्हापूर :
येथील थांग – ता असोसिएशनने गणेशोत्सवात ‘एक पाऊल निसर्गाकडे’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमातून विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींची माती जमा करण्यात आली. अशी ८२ पोती शाडूची माती जमा झाली आहे.
परंपरेप्रमाणे शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणारी अनेक कुटुंबे शहरात आहेत. त्यांच्याकडून भक्तिभावाने मूर्तीचे पूजन करून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाते. पाण्यात विरघळलेल्या शाडूचे काय ?, असा प्रश्न होता. यासाठी ८ वर्षांपूर्वी थांग – ता असोसिएशनने कृतिशील पावले उचलत ‘एक पाऊल निसर्गासाठी’ उपक्रम आखला आणि कुंडात विरघळलेली गणेशमूर्तीची माती जमा करण्यास सुरुवात केली.
भविष्यात शाडूच्या मातीची टंचाई भासू नये, यासाठी थांग – ता असोसिएशनने पाण्यात विरघळलेला शाडू पुन्हा मूर्तीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. यावर्षी गौरी गणपती विसर्जन झाले. घरगुती गणेशमूर्ती विसर्जित झालेली आणि सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जित केलेली गणेशमूर्तीची माती एकत्रितपणे करण्यात आली.
काही मंडळांनी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेने अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड केले होते. रंकाळा, शाहूपुरी, सावित्रीबाई रुग्णालय येथील परिसरात तेथील कार्यकर्त्यांनी शाडूच्या मूर्तींचे स्वतंत्रपणे विसर्जन करण्याचे गणेशभक्तांना आवाहन केले होते. यंदा अशा घरगुती २९१ मूर्तीचे काहिलीत विसर्जन केले. विसर्जन कुंडातील शाडूमाती थांग – ता असोसिएशनकडे जमा केली. गतवर्षीही अशी शाडूमाती कुंभारबांधवांना देण्यात आली होती. यंदा शाडूमाती सुमारे ८२ पोती जमा झाली.
गणेशमूर्तीचा हा शाडू पुर्ननिर्मितीसाठी फुलेवाडी येथील शुभम कुंभार आणि शाहूपुरी येथील सतिश वडणगेकर या कुंभारबांधवांकडे जमा करण्यात आला. या उपक्रमाचे नियोजन इंडियन मार्शल आर्ट थांग – ता असोसिएशनचे सचिव सतिश वडणगेकर यांनी नियोजन केले होते. यासाठी अध्यक्ष प्रेम भोसले यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page