Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम उत्साहात

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम उत्साहात

कोल्हापूर :
सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी अभियांत्रिकी व शॉर्ट टर्म कोर्सेस ‘प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम’ विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष पदवी विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी महाडिक, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, सर्व विभागाचे  विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन कांबळे यांनी मानले. घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
53 %
2.6kmh
52 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page