कोल्हापूर :
शिराळा (जि. सांगली) येथील सक्सेस अकॅडमीच्या कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.
या यशाबद्दल सर्वेशा शेळके हिचा वारणा बॅंकेचे संचालक अरविंद बुद्रुक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य अकॅडमी बारामतीचे ज्ञानेश्वर मुटकुळे उपस्थित होते. यावेळी सक्सेस अकॅडमीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सक्सेस अकॅडमीच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात या शिक्षणसंस्थेचा भर राहिला आहे. सतत सराव, परीक्षा व सखोल अभ्यास अशा बाबींवर लक्ष दिल्यामुळे येथील विद्यार्थी विविध परीक्षेत यश संपादित करत असल्याचे सक्सेस अकॅडमीचे प्रमुख वर्धमान बुद्रुक यांनी सांगितले.
सर्वेशा शेळकेला सक्सेस अकॅडमीच्या प्रतिभा बुद्रुक, भरत बोरगे, सारिका बोरगे व प्राचार्य सुरेश मगदूम, स्वप्नाली मगदूम, प्रा. सुधीर मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.7
°
C
29.7
°
29.7
°
71 %
3.8kmh
100 %
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°

